 
      तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव ची विद्यार्थिनी तनिष्का चोरमले सर्वप्रथम.... जिल्हास्तरावरती निवड.....आज संपन्न झालेल्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान भाषण स्पर्धेमध्ये कु.तनिष्का चोरमले या विद्यार्थिनीने "काँटम युगाची सुरुवात: संभाव्यता व धोके" या विषयावर सादरीकरण करून तालुक्यात 51 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला, तिची जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये निवड झाली..तिला विज्ञान शिक्षक म्हणून ताराचंद खराद सर यांनी मार्गदर्शन केले..तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब, सचिव श्रीमती मनीषाताई टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर. गायकवाड सर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर मुख्याध्यापक राहुल साळवे पंचायत समिती चे पवार सर गव्हाड मॅडम,मुख्याध्यापक कल्याण सोळुंके पालक रामेश्वर चोरमले सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.....